36) मी अनुभवलेला बिहार / Dr. कल्पना शास्त्री

Image

36) मी अनुभवलेला बिहार / Dr. कल्पना शास्त्री /  मनोविकास प्रकाशन/ प्रथम आवृत्ती ०८-०३-२०११/ Rs १६०/- पृष्ठे १६३:

२५ वर्षापूर्वी ज्यावेळी देशातील सुशिक्षित वर्ग बिहारला जायला नाखूष असे , घाबरत असे आणि बिहारमधले लोक काम – धंद्याच्या शोधात बिहार सोडून जात असत, त्यावेळी महाराष्ट्रातील सुव्यवस्थित वातावरण सोडून लेखिका स्वखुशीने बिहारला गेली व दूर गावामध्ये कार्य करायला लागली.

ह्या दरम्यान लेखिकेला आलेले अनुभव, तिने केलेली निरीक्षणे ह्या पुस्तकात टिपलेली आहेत. बिहारमधील जाती व्यवस्था, स्त्रीयांना मिळणारी वागणूक, त्यामागची कारणे  ह्याचा मागोवा ह्या पुस्तकात घेतला आहे.

पुस्तकात लेखिकेला दिसलेला समाज, त्याच्या गरजा, कौटुंबिक – सामाजिक रचना ह्याबद्दलही  भाष्य  आहे.
पुस्तक वाचताना तिथली परिस्थिती बघून आपण मन अस्वस्थ होत राहतो. त्याचवेळी  लेखिका करत असलेले कार्य बघून मन भरून येते.  स्वतंत्र  भारतात काही लोकांच्या वाट्याला आलेले असे जीणे बघून लाज वाटायला लागते.

हे  पुस्तक प्रत्येकाला आवडेल असे नाही. स्वत:च्या संवेदना जिवंत आहेत का  हे तपासून बघायचे असेल तर अश्या पुस्तकांना पर्याय नाही.

लेखिकेला आणि तिचा कार्याला मनापासून सलाम. असे पुस्तक प्रसिध केल्याबद्दल मनोविकास प्रकाशनाचे सुद्धा अभिनंदन.

मित्रानो, पुस्तक नक्की वाचा.

Advertisements

0 Responses to “36) मी अनुभवलेला बिहार / Dr. कल्पना शास्त्री”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2012
M T W T F S S
« Apr   Jun »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: