३५)जन्म आईचा / Dr. मीना चिमोटे आणि Dr. नटचंद्र चिमोटे

Image

३५)जन्म आईचा / Dr. मीना चिमोटे आणि Dr. नटचंद्र  चिमोटे / मुक्तछंद प्रकाशन / Rs. १००/-

पृष्ठे १०८ / ०७-०१-२००९

हे पुस्तक ‘Sex education ‘ ह्या विषयावर आहे. हा ‘शब्द’ उच्चारणेसुद्धा ह्या समाजात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे ह्या विषयाचे शिक्षण योग्य रीतीने देणे दूरच. सरकार मधेच काही निर्णय घेण्याचा प्रयत्न  करते. पण शाळा – कॉलेजात हे घडे शिकविण्याच्या फंदात कोणी शिक्षक पडत नाही. घरी आई -वडीलही हा विषय टाळत असतात. मी जन्माला कसा आलो ह्याचे थातुरमातुर उत्तर दिले जाते. मग हि पिढी हे शिक्षण मित्रांकडून, सिनेमातून, Internet च्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करते. पण हे शिक्षण अपुरे व नवीन प्रश्न निर्माण करणारे असते. मुली तर जात्याच लाजाळू. आईजवळही हा विषय मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. शिक्षण पूर्ण होते. नोकरी लागते आणि तरुण मुले -मुली लग्नाच्या बोहल्यावर उभी राहतात.

एक नवीन नाते सुरु होणार असते. हा दोन जीवांच्या आयुष्याचा प्रश्न असतो. त्यांच्या बरोबर दोन कुटुंबेही एकमेकांशी जोडली जातात. एक अनामिक भीती मनात बाळगून ह्या नात्याला सुरवात होते. मधुचंद्र नेमका कशासाठी असतो ह्याच्या रंजक कहाण्या ऐकलेल्या असतात. मानसिक पातळीवर मिलन होण्याआधी शारीरिक पातळीवर निराशा आलेली असते. नाते हळुवारपणे फुलण्याआधीच मनाला हादरे बसतात.

हि स्थिती टाळण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ह्या पुस्तकात सर्व माहिती अतिशय सोप्या भाषेत समजावली आहे. चित्रांच्या माध्यमातून विषयावर भाष्य केले आहे. ह्या  डॉक्टर दाम्पत्याने टेस्ट Tube बेबीचे तंत्रज्ञान प्रथमच मध्य भारतात आणले. हा वैज्ञानिक विषय समजावताना मानवी मनाचे कंगोरेही समर्थपणे दाखविले आहेत.

हे पुस्तक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना अर्पण केले आहे. मुल नसलेल्या जोडप्यांना ह्या समाजात मानसिक त्रास सहन करावा लगतो हे दुर्दैव आहे. हा विषय तेव्हाही मोकळेपणी बोलता येत नाही  व मग अकारण वेगवेगळे उपाय करून पैसा वाया जातो. मन आणखीन खच्ची होते. निराशेने मन ग्रासते. अशावेळी नवऱ्याची साथ असेल तर बायकोचे जीणे सुसह्य असते नाहीतर तिला घटस्फोट घ्यावा लागतो. सगळे खापर तिच्या  माथी मारले जाते. अश्या दाम्पत्यांना ह्या पुस्तकात उपचारांची दिशा मिळेल आणि आशेचा किरण दिसेल.

हे पुस्तक सर्व तरुण – तरुणींनी, लग्न होण्याआधी वाचले पाहिजे. आई -वडिलांनी सुद्धा वाचून आपल्या पौगंडावस्थेतील  तरुण मुलांना मार्गदर्शन केले पाहिजे. असे झाले तर माझ्या मते ह्या पुस्तकाचा  हेतू सफळ होईल.

असे समाजाला उपयोगी पुस्तक लिहिल्याबद्दल ह्या डॉक्टर दाम्पत्याचे मनापासून अभिनंदन. त्यांच्या कार्याला मनापासून सलाम व Best wishes.

पुस्तकातील विषयाची मांडणी रंजक आहे व case study च्या माध्यमातून विषय समजाविला आहे. पुस्तक वाचताना  कंटाळा येत नाही.  पुस्तकाचा Font चांगला आहे.मित्रानो, वेळ काढून हे पुस्तक वाचा व तरुण पिढीला वाचायला सांगा.

Advertisements

0 Responses to “३५)जन्म आईचा / Dr. मीना चिमोटे आणि Dr. नटचंद्र चिमोटे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2012
M T W T F S S
« Apr   Jun »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: