१४२) दागिना / Ornaments

Image

 

१४२) दागिना / Ornaments 

जगभर लोकांना दागिन्यांचे वेड आहे.  भारतीयसुद्धा याला अपवाद नाहीत. उलट दागिने हा  भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण तुमच्या लक्षात आले असेलच. असो.

दागिने म्हटले म्हणजे आपल्याला स्वाभाविकपणे सोने, आपला Jewellery Box , सोनाराचे दुकान -पेढी आठवते. सोन्याला एवढे महत्व आहे कि पेपर  मध्ये -TV channel वर सोन्याचा भाव, मागणी, लोकांच्या प्रतिक्रिया, वगैरेचा उहापोह चालू असतो. ह्या वर्षीच्या Budget मध्ये सोन्याच्या दागिन्यांवर कर लावल्यामुळे सोनार संपावर गेले. 🙂

खरेतर माणसाचे इतर दागिन्यांकडे लक्ष जात नाही हे विचित्र आहे. मित्रानो. मला कल्पना आहे कि तुम्ही माझ्या ह्या वाक्याने चक्रावला असाल. मी तुमची Curiosity जास्त ताणत नाही. मला खात्री आहे कि माझा हा लेख वाचून झाल्यानंतर तुम्हालाच उमजेल कि आपण खरेच इतर दागिन्यांकडे लक्ष देत नाही. असो. Better late than Never.

आपला पहिला दागिना म्हणजे आपले शरीर. निरोगी  शरीराचे मोल  हे कोणत्याही सोन्याच्या दागिन्यापेक्षा जास्त आहे. ह्याची प्रचीती तुम्हाला गंभीर आजार  झाला  कि येते. काय पटतेय का? कित्येक जन्म -मरणाच्या चक्रातून  गेल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. तेव्हा  हे शरीर निरोगी ठेवणे हे  आपले  प्रथम कर्तव्य होय. पण किती लोक हे कर्तव्य बजावतात? किती लोक  स्वत:च्या शरीरावर कसे कमी अत्याचार होतील हे बघतात? शरीराची काळजी घेणे  सोपे आहे. तुम्हाला एक कानमंत्रच देतो.

नुकताच ०७-०४-२०१२ रोजी जागतिक आरोग्य दिन झाला. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी निसर्गोपचारातील एक हिंदी कविता सादर करतो.
पाव को रखो गरम (नियमित व्यायाम करा)
पेट को रखो नरम (जेवण – खाण्यावर नियंत्रण हवे)
मगज को रखो थंडा (मन चिंता मुक्त करा)
वैद्यजी को मारो दंडा (वरील प्रमाणे वागणे असेल तर डॉक्टरकडे जावेच लागणार नाही)
Health is Wealth. (चांगले आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती व दागिना  होय.)
तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी माझ्या शुभेच्छा.

वेळ मिळाल्यास माझ्या Website च्या Medical Section ला नक्की भेट द्या. आरोग्य चांगले राखण्यासाठी भरपूर टिप्स व घरगुती उपाय दिले आहेत. चिंतामुक्तीसाठी सुद्धा मार्गदर्शन केले आहे.
जर तब्बेत चांगली असेल तर आयुष्यातील अनेक समस्या कमी होतील. काय पटतोय का माझा विचार?

चांगले गुण अंगी असले किवा बाणवले तर त्याचे मोल  दागिन्यापेक्षा अधिकच होईल. हे गुण म्हणजे Sincerity, honesty, involvement, good work culture,  empathy, helping attitude, equality complex, keeping child instinct alive even in old age , सामाजिक बांधिलकी etc. ह्या गुणांचा वापर जेव्हा  जास्त प्रमाणात होईल तेव्हा समाजाचे आरोग्य सुधारेल.

हे गुण काही वेळा उपजत असतात. पण आपल्या शिक्षणाने, अनुभवाने हे गुण आपल्याला अंगी बाणवता येतात. फक्त प्रयत्न सोडता कामा नयेत.

वर उल्लेख केलेले दागिने असतील आणि कुटुंबात प्रेमळ जीव लावणारी माणसे असतील तर  तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांची आठवणही होणार नाही.

एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे सुरक्षिततेसाठी  दागिने हे बँकेतील Locker मध्ये ठेवले जातात. अगदी जवळच्या नातेवाईकाच्या समारंभात वापरले जातात. बरेच वेळा जोखीम टाळण्यासाठी एक ग्राम सोन्याचे दागिने घातले जातात. तुम्ही श्रीमंत असाल तर लोकांना माहित असते की तुमच्याकडे भरपूर दागिने आहेत. त्यामुळे तुम्ही दागिने मिरवले नाहीत तरी फरक पडत नाही. अर्थात आकस्मिक अडचणीच्या वेळी दागिने गहाण ठेहून कर्ज काढता येते. असो. काळा पैसा बरेच वेळा दागिन्यांच्या रुपात साठवला जातो.

मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत. मी फक्त माझा वेगळा विचार सांगितला.
मित्रानो, काय पटला का विचार? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. माझा E-Mail Id: spandane2008@gmail.com

CA. सुधीर वैद्य
http://www.spandane.com
http:// spandane.wordpress.com
24-04-2012

CA. Sudhir Vaidya

Follow me on …..
www.spandane.com
https://spandane.wordpress.com/

 

Advertisements

0 Responses to “१४२) दागिना / Ornaments”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: