लेख – ७ / २९-११-२०११ सूर्यास्त / Sunset

लेख – ७ / २९-११-२०११ सूर्यास्त / Sunset

Spandane Photo Gallery :

लेख – ७  / २९-११-२०११

सूर्यास्त / Sunset 

मित्रानो आज मी सुर्यास्ताचा  Album Share  करणार आहे. सूर्यास्त बघायला सर्वांना आवडतो. सूर्यास्त बघण्यासाठी हिल स्टेशन वर आवर्जून जाणे होते. पण आपल्या गावातून / शहरातून दिसणारा सूर्यास्त बघायला लोकांकडे  वेळ नसतो. अर्थात हे माझे निरीक्षण आहे. असो.

माझे व सूर्यास्ताचे लहानपणापासून फारच जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कदाचित माझे बालपण त्याला कारणीभूत असेल. मला बालपण होते का? 😦   वडील फार थोड्या वर्षांचे सोबती आहेत हे लहानपणी कळल्या नंतर त्यांच्या मृत्युच्या छायेत मी मोठा झालो. मृत्युची भीती त्यांच्या डोळ्यात दिसत असे. मुलाबाळांची काळजी सुद्धा डोकावत असे. त्यामुळे असेल कदाचित, पण दर रविवारी मी चौपाटीवर सूर्यास्त  बघायला जात असे. अगदी लहान असताना वडिलांबरोबर, मग भावाबरोबर आणि नाहीतर एकटा.

College सकाळी १० ते २ असे. घर लहान असल्यामुळे मी अभ्यास करण्यासाठी Library त रात्री ८ वाजेपर्यंत थांबत असे. संध्याकाळी  मात्र अर्धा तास सूर्यास्त बघण्यासाठी समुद्र किनारी पळत असे. (College पासून समुद्र किनारा ५ मिनिटावर होता.) उच्च शिक्षण झाल्यानंतर कंपनीत काम करताना Cabin मधूनच सूर्यास्त दिसे. Project  Site ला गेलो कि मी व Project Manager , ८ मजले उंच Chemical च्या टाकीवर सूर्यास्त बघण्यासाठी जात असू. गेले ते दिवस. 🙂

नंतर June १९८५ पासून  व्यवसाय (CA ) सुरु केला, संसारात पडलोच होतो  🙂 आणि रोजचे सूर्यास्त दर्शन बंद झाले.

माझ्या वडिलांना निवृत्ती पूर्वी २ महिने (वयाच्या ५८ व्या वर्षी) मृत्यूने गाठले होते. त्यावेळी मी १८ वर्षांचा होतो. (१९६९) त्यावेळेपासून मला ६० वर्षे आयुष्य आहे असे कल्पून मी आयुष्याची आखणी केली.  मी रोज देवाकडे प्रार्थना करत असे कि मला ६० व्या वर्षी मृत्यू येउदे म्हणजे वडिलांसारखी निराशा पदरी येणार नाही. ६० वर्षात मी सर्व काही करून घेईन.  ( शिक्षण, नोकरी, व्यवसाय, संसार, Hobbies ,  प्रवास, Second home, समाज सेवा वगैरे) १९९६ साली एका भीषण अपघातातून वाचलो आणि मला प्रकर्षाने लहानपणच्या इच्छेची आठवण झाली.  माझ्याकडे फक्त १४ वर्षे होती.

अपघातातून वाचलो आणि गाव मला खुणाऊ लागले. १९९७ साली Second Home  चा ताबा घेतला व दर महिन्याला ४ दिवस गावी जाऊ लागलो. घरापासून समुद्र किनारा ५ मिनिटावर आहे. परत एकदा सूर्यास्ताच्या प्रेमात पडलो.

३१-१२-२००० पासून व्यवसायातून टप्याटप्याने निवृत्ती घेत गेलो व ३०-०४ -२०११ ला व्यवसायातून संपूर्ण निवृत्ती घेतली.  (नोकरी आणि व्यवसायाचा कालावधी ४० वर्षे) नोकरीत आणि व्यवसायात गुरु-शिष्य परंपरा  जपली.  एकाच वेळेला मी माझ्या सहकाऱ्यांचा  गुरु व त्याच वेळी त्यांचा शिष्य झालो. सर्वाना Equality Complex चा गुरु मंत्र दिला.

१९९७ साली पर्यायी वैद्यक शाखेचा अभ्यास केला
१९९८ पासून नियमितपणे सहनिवासातील लोकांचे  BP  & Pathological Reports  तपासू लागलो.  आजारी माणसाला वैद्यकीय सल्ला व  धीर देऊ लागलो. म्हाताऱ्या लोकांसाठी वेळ काढू लागलो. बरेच ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे येऊन मन मोकळे करतात. नाहीतरी त्यांचे ऐकायला घराच्या मंडळीना वेळ कोठे असतो? हे व्रत आजतागायत चालू आहे.

१९८७ साली ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला. आज हि अभ्यास चालू आहे. माझ्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे शोधली. (माझ्या लहानपणी कोणताही ज्योतिषी ह्या प्रश्नांवर उजेड पाडू शकला नव्हता. )  सध्या वैद्यकीय ज्योतिष शास्त्राचा अभ्यास चालू आहे.

Photography चे वेड लहानपणापासून होते. त्या छंदात भरच पडत गेली. हजारो फोटो व Video  काढले व Computer वर Save  केले. तसेच  मित्रांबरोबर Share केले.

व्यवसायात वेगळ्या वाटा निवडल्या. Audit , Management  Consultancy  बरोबर Company formation, Company Secretarial Work, Insurance Surveyor, Insurance Investigator, Examiner of ICAI, ICSI, ICWA, IIB, Paper setter of IBPS,  Faculty Member in Staff Training Centre,  Writing many books on Audit,  Inspection, Training, Project Appraisal, Management, Investment , Medical,  Marriage, Astrology, Life Philosophy, Poems etc. , looking after Client’s business in his absence etc.

हे सर्व करत असताना Counselling चे काम हि करत होतो. लोकांच्या  छोट्या , मोठ्या  कौटुंबिक Problem चा गुंता सोडवत होतो. आजही हे काम गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे.  वेळात वेळ काढून society audits   केवळ समाज सेवेच्या भावनेतून केली. २० वर्षे Examiner चे काम सुद्धा केवळ  समाज सेवा म्हणूनच केले. माझा लेख My Social Service has been uploaded on my website. (Article 74)

मी घेतलेले उच्च शिक्षण , नोकरीतील / व्यवसायातील अनुभव, आयुष्यात जोपासलेले छंद (Medical,Photography, Astrology, Graphology, interpretation of body language,  writing books etc.) याचा फायदा इतरांना व्हावा म्हणून मे २००८ मध्ये मी website  http://www.spandane.com host केली. आजपर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांनी website ला भेट दिली आहे. website  ला आजपर्यंत ८,००,००० हून जास्त Hit झाल्या आहेत. ह्या सर्व Hobbies साठी मी  भरपूर पैसा खर्च केला आहे.

१९९६ सालापासून संसारात राहून वानप्रस्थाश्रम  स्वीकारला. सर्व समारंभांना जायचे बंद केले. ती जबाबदारी माझी बायको सांभाळते. प्रवास हि बंद केला.

थोडक्यात म्हणजे ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी ६० वर्षात पूर्ण केल्या. नातवंडांसाठी ४०० पानाचे आत्मचरित्र लिहून ठेवले. (त्यांना जर मोठे झाल्यावर आजोबाला जाणून घ्यावे असे वाटले तर मीच ती सोय करून ठेवली. )

१५-०५-२०११ ला ६० वर्षे पूर्ण झाली. दिवस एकांतात घालवायचे ठरवले. पण माझ्या मुलाने आणि सुनेने तसे होऊ दिले नाही. माझा वाढदिवस घरच्या घरी पण दणक्यात साजरा केला. मुलगी नातवाना घेऊन संध्याकाळी   आली व परत एकदा Cake कापून वाढदिवस साजरा झाला. मला १६-०५-२०११ ची प्रतीक्षा होती. देव माझी लहानपणापासूनची विनंती मान्य करतो का? पण नाही. तसे झाले नाही. देवाने माझी विनंती मान्य केली नाही आणि आज मी हा लेख लिहित आहे.

असा हा माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनाचा सूर्यास्ताकडे जाणारा प्रवास. हा लेख वाचून मग माझा Sunset Album  बघावा. मला खात्री आहे कि तुमचे मन सुद्धा भूतकाळात रमेल. Sunset चे माझ्या कडे शेकड्यांनी फोटो आहेत. त्यातील निवडक फोटो अल्बम साठी निवडण्यासाठी मला तारेवरची कसरत करावी लागली.

Sunset Album  Link : http://bit.ly/tFgZS5

आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा हि नम्र विनंती. नुसेतच Like करून पुढे जाऊ नका.  माझा Email ID: spandane2008@gmail.com

सुधीर वैद्य
२९-११-२०११
http://www.spandane .com

Advertisements

2 Responses to “लेख – ७ / २९-११-२०११ सूर्यास्त / Sunset”


  1. 1 Suchita Oke-Dikey November 27, 2012 at 7:05 am

    apratim…saglech pics..khup sundar alet..Sudhir ji…


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: