८) आनंददायी जीवनसंध्या / मीरा भट्ट / अनुवाद – सुलभा कुलकर्णी

Image

८) आनंददायी जीवनसंध्या / मीरा भट्ट / अनुवाद – सुलभा कुलकर्णी / प्रकाशक – रघुनाथ कुलकर्णी / ०३-११-२०१० / Rs ७५/- पृष्ठे ८८

दोन शब्द लेखिकेबद्दल:

श्रीमती मीरा भट्ट या विनोबांच्या शिष्या. २५-३० नामांकित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. ‘जीवन संध्यानू स्वागत’ हे पुस्तक  त्यांनी गुजरातीत लिहिले. त्यांची कन्या अमी भट्ट यांनी त्याचे  हिंदीत भाषांतर  केले. हिंदी कवयित्री श्रीमती नंदिनी मेहता यांनी ‘जीवन संध्या का स्वागत‘ या नावाने ते प्रसिद्ध  केले . नंतर सुलभा कुळकर्णी यांनी त्या पुस्तकाचे मराठी भाषांतर केले.

गुजराती आणि हिंदी पुस्तकाच्या लाखाच्यावर प्रती विकल्या गेल्या आहेत.

आता थोडे पुस्तका बद्दल:

बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बदल हा  निसर्गाचाहि नियम आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या आयुष्याचा प्रवास अंताकडे चालू असतो. पण आपण मृत्यू हा शब्द हि निषिद्ध मानतो, तर त्या बद्दल विचार करणे आणि म्हातारपणाची तयारी करणे दूरच राहिले. हे पुस्तक आपल्याला शेवटचा दिवस गोड व्हावा ह्यासाठी मदत करते व आपल्या विचारांची दिशा बदलण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे हे पुस्तक खरतर तरुण मंडळीनी वाचायला पाहिजे. पण जेष्ट नागरिक हि हे पुस्तक आता वाचून आपल्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न करू शकतात.

पुस्तकात खालील विषयांचा उहापोह केला आहे.

१) वेळेवर जागे व्हाल का?
२) जीवन मंदिराचा सुवर्ण कळस.
३) असा जन्म नाही वारंवार.
४) देह – आत्म्याचं देऊळ.
५) नात्यातील सौंदर्य.
६) वृद्धाश्रम -अनिवार्य अरिष्ट.
७) जनसेवा हीच प्रभूसेवा.

विनोबा भावे आणि साने गुरुजींनी मृत्यू बद्दल खूप छान विवेचन केले आहे. पुस्तक वाचताना त्याची सारखी आठवण आल्या शिवाय राहत नाही.
माणसाला मरणाची नेहमी भीती वाटत असते. हे स्वाभाविक पण आहे. खरेतर हि भीती मरणाची असतेच पण त्याहून जास्त भीती असते कि आपण लोळत पडणार का? आपली कोण सेवा करणार.? पत्नी आधी वारली असेल तर हि चिंता पराकोटीची असते. ह्यामुळेच ‘मरण’ हा शब्द उच्चारायला पण माणूस घाबरतो. विनोदाने बोलायचे तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की आहेत, त्या म्हणजे मरण आणि कर. (Taxation) 🙂

आपले आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या मधील प्रवास आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. Pascal (तत्ववेत्ता) म्हणतो कि मृत्यू    नक्की आहे, फक्त वेळ अनिश्चित आहे. मग मृत्यू  बद्दल काळजी करण्यात काय अर्थ आहे?

कै. विनोबा भावेनी आपल्या ‘भगवत गीता ‘ ह्या पुस्तकात मृत्यू बद्दल छान विवेचन केले आहे. माणसाला शांतपणे मरण येण्यासाठी ४ देवतांची कृपा आवश्यक  आहे.

१) Fire / अग्नी म्हणजे काम. माणसाने शेवट पर्यंत कार्यमग्न राहिले पाहिजे.

२) Moon / चंद्र म्हणजे चांगले, क्षमाशील मन असले पाहिजे.

३) Sun  / सूर्य म्हणजे सतत नवीन शिकणे. शिक्षणाचा / अनुभवाचा उपयोग लोकांसाठी करणे.

४) Space  /अवकाश म्हणजे वासना मेली पाहिजे. (detached attitude )

  ह्या देवतांची मर्जी संपादन करण्यासाठी तरुण वयातच अभ्यास सुरु करावा लागेल. हा अभ्यास वाटतो तेव्हडा सोपा नाही. पूजा अर्चा, कर्म कांड एकवेळ निभावता येईल पण क्षमाशील मन, कार्यमग्नता, सेवेतील आनंद आणि वासने वर विजय संपादन करणे, खूप कठीण. असा अभ्यास करण्यासाठी ह्या पुस्तकाची आपल्याला नक्की मदत होईल.

पुस्तकाचा Font मोठा आहे. पुस्तकात फाफट पसारा नाही. लेखिकेने directly विषयालाच हात घातला आहे. त्यामुळे वाचताना आपण हि गुंगून जातो व पुस्तक एका बेठकीत वाचून होते.

मित्रानो , पुस्तक नक्की वाचा, म्हातारपणाची तयारी करा व आनंदाने म्हातारपणाचे स्वागत करा.

सुधीर वैद्य
०४-१२-२०११

ता.क. :
माझ्या परीने मीही ह्या विषयाचा अभ्यास तरुण वयात केला. कदाचित माझ्या बालपणातून मी हे शिकलो असेन. हे पुस्तल मी काल वाचले पण खूप पूर्वीच मी ह्या विषयावरील लेख माझ्या संकेत स्थळावर upload  केला आहे. Path: http://www.spandane.com —> Spandane –> Spandane Articles—> Article 107 -Behaviour Therapy for Senior Citizens. वेळ मिळाल्यास नक्की वाचा.

Advertisements

0 Responses to “८) आनंददायी जीवनसंध्या / मीरा भट्ट / अनुवाद – सुलभा कुलकर्णी”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: