१७) खरे खुरे आ य डॉल्स – भाग दोन / युनिक फीचर्स

Image

१७) खरे खुरे आ य डॉल्स – भाग दोन  / युनिक फीचर्स / तिसरी आवृत्ती ०६-१२-२०१० / समकालीन प्रकाशन / रुपये २०० /-पृष्ठे २२१

मित्रानो, पुस्तकाचे नाव वाचून बुचकळ्यात पडलात ना? मला कल्पना आहे कि काही लोकांना इंडियन  आ य डॉल्स आठवण्याची शक्यता आहे.
परंतु हे पुस्तक खऱ्या आ य डॉल्स चे आहे. समाजात अशी माणसे आहेत हे आपले भाग्य आहे.

ह्यातील बऱ्याच आ य डॉल्स बद्दल आपल्याला माहिती आहे. पण ह्या पुस्तकात असेही काही आ य डॉल्स आहेत ते बऱ्याच जणाना माहित नसण्याची शक्यता आहे. ह्या माणसांचे कार्य बघून आपण अचंबित होतो. ह्या आ य डॉल्स च्या कार्याची माहिती वाचताना काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात येतात. एक समान सूत्र आपल्याला गवसते. ह्या थोर मंडळीनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता सामाजिक बांधिलकीचा  प्रथम विचार केला. ह्या  मंडळीनी स्वधर्मावर / स्वत:च्या कार्यावर पूर्ण विश्वास तर ठेव्हलाच पण ज्या लोकांसाठी  कार्य करायचे त्यांच्या बद्दल मनात प्रेम हि होते. म्हणूनच  ह्या कार्याचा समाजासाठी उपयोग झाला. ह्या माणसांनी समसेच्या मुळाशी जाऊन प्रयत्न केले. विरोध होणार हे माहित असूनही, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेऊन कार्य सुरु ठेवले. समस्या सोडवताना चाकोरी बाहेरचा विचार केला.

मित्रानो, आपल्या पैकी प्रत्येकाने वरील सूत्रांचे भान ठेवून  स्वधर्म पार पडला तर ह्या समाजात क्रांती व्हायला वेळ लागणार नाही.

ह्या आ य डॉल्स मध्ये अश्या काही व्यक्ती आहेत कि त्यांनी सरकारी नोकरीत असूनही त्या कामाला  सरकारी कामाचे स्वरूप न देता समाजासाठी काम केले. हे खूपच कठीण आहे. असे काम जर प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने केले तर समाज सुखी होईल. आश्चर्य म्हणजे हेच लोक  समाजाचे घटक असताना हि अशी अपेक्षा त्यांच्या कडून करावी लागते हे आपले दुर्दैव.

ह्या पुस्तकाचा पहिला भाग १५-०८-२००६ मध्ये प्रसिद्ध झाला. माझ्या मते ह्या पुस्तकाचे वाचन प्रत्येक शाळेत झाले पाहिजे. पालकांनी आपल्या मुलाबाळांना हे पुस्तक वाचायला प्रवृत्त केले पाहिजे. तरुण मंडळी नेहमी म्हणत असतात कि ज्यांचे अनुकरण करावे अशी माणसे दुर्मिळ आहेत. ज्यांचे पाय धरावे असे पाय आज मिळत नाहीत. ह्या पुस्तकात २५ व्यक्तींच्या कार्याची माहिती दिली आहे. हि माहिती खूप मुद्देसूद आहे. त्यामुळे वाचायला वेळ नाही अशीहि सबब देता येणार नाही. ह्या पैकी बऱ्याच मान्यवरांच्या मुलाखती You Tube वर सुद्धा उपलब्द्ध आहेत.

पुस्तक वाचता वाचता आपल्या मनात वेगवेगळे विचार येत राहतात. आपण मधेच सुन्न होतो, आपले डोळे पाणावतात, सरकारी यंत्रणेचा रागहि येतो. पण त्याच वेळी माणुसकी वरील विश्वास दृढ होत जातो. मनात होकारात्मक विचार येऊ लागतात. ह्या आपल्या प्रिय देशाला उज्जल भवितव्य आहे ह्याची खात्री पटते.

मित्रानो, हे पुस्तक वेळात वेळ काढून नक्की वाचा. मनातील नकारात्मक विचार कुठे पळून जातील हे कळणारही नाही.

ह्या थोर मंडळीना मनापासून नमस्कार.   असे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल युनिक फीचर्सचे मनापासून अभिनंदन.   

सुधीर वैद्य
१५-०१-२०१२

Advertisements

0 Responses to “१७) खरे खुरे आ य डॉल्स – भाग दोन / युनिक फीचर्स”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: