१६) पाहिलेले देश , भेटलेली माणसं / मंगला नारळीकर

 

 

 

 

 

 

 

१६) पाहिलेले देश , भेटलेली माणसं  / मंगला नारळीकर / राजहंस प्रकाशन / दुसरी आवृत्ती ऑक्टोबर २०१० / Rs. २५०/- पृष्ठे २५५

लेखिकेचा विवाह १९६६ साली सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्याबरोबर झाला. पतीबरोबर त्यांचा जगभर प्रवास झाला. जयंत नारळीकराना जगभरातून व्याख्यानासाठी, अधिवेशानासाठी आमंत्रणे येत. बरेच वेळा हा परदेशदौरा काही दिवसांचा ते काही महिन्याचा असे. पण लेखिकेने त्या वेळेचा चांगला  उपयोग केला.

लेखिकेचे आवडते विषय म्हणजे शिक्षण, चित्रकला, शिल्पकला, बागा, झाडं, फुलं, पक्षी आणि समाजजीवन. त्यामुळे लेखिकेने  ह्या विषयांच्या अनुषंगाने पर्यटन केले व आपले अनुभव नोंदविले. त्यामुळे हे नेहमीच्या अर्थाने प्रवास वर्णन नाही.

परदेश प्रवास म्हटला म्हणजे अमेरिका, युरोप, इंग्लंड हे देश/ प्रदेश साहजिकपणे आठवतात. पण ह्या पुस्तकात अशा काही देशांची माहिती आहे कि  आपल्याला हे देश चटकन आठवत हि नाहीत. पाकिस्तानाबद्दल आपण वाचतोच  असे नाही. लेखिकेने आपल्या शेजारील  देशांचे (पाकिस्तान आणि श्रीलंका) यांचे सुरेख वर्णन केले आहे.

प्रवास वर्णने अतिशय सोप्या भाषेत केली आहेत. त्यामुळे बरेच वेळा आपणही त्या प्रदेशात लेखिकेच्या नजरेतून मुसाफिरी करून येतो. पुस्तकातील सगळेच लेख छान आहेत. काही लेखातून आपल्या माहितीत भर पडते. उ.ह. मध्यरात्रीचा सूर्य.

निवेदनाच्या ओघात लेखिका custom  च्या  नियमांबद्दलहि सांगून जाते. तसेच दोन देशांची तुलना करताना भारतातील परिस्थितीवर नेमकेपणाने भाष्य करून जाते व आपण भानावर येतो. लेखिका त्या देशाच्या इतिहासाचासुद्धा शोध घेते. त्यामुळे हे पुस्तक म्हणजे निरनिराळ्या देशांचा वर्तमान आणि भूगोल यातून इतिहासाचा वेध घेत केलेले सुरेख लेखन आहे.

पुस्तकाचा font हि मोठा आहे त्यामुळे वाचताना त्रास होत नाही. पुस्तकातील  फोटो, प्रवास वर्णन अधिकच रंजक करतात. लेखिका हे पुस्तक मनमोकळेपणाने आपल्या पतीला अर्पण करते.

असे छान पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल राजहंस प्रकाशाचे आभार.

छान अनुभव share केल्याबद्दल लेखिकेचे आभार.

सुधीर वैद्य
०७-०२-२०१२.

Advertisements

0 Responses to “१६) पाहिलेले देश , भेटलेली माणसं / मंगला नारळीकर”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: