१४) जनामनातला माणूस निळू फुले / लेखक रजनीश जोशी

Image

१४) जनामनातला माणूस निळू फुले / लेखक रजनीश जोशी /मैत्रेय Publication / जुलै २०१० / रुपये ७५/- पृष्ठे १६८

निळू फुले माहित नाहीत असा माणूस अपवादानेच मिळेल. आपण सर्वजण निळू फुलेना एक चांगला नट महणून ओळखतो. पण एवढीच ओळख हा निळू फुलेंवर अन्याय होईल . निळू फुले हे नट ह्या प्रतिमेपेक्षाही खूप मोठे व्यक्तिमत्व होते. ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची ओळख हे पुस्तक करून देते.

निळू फुलेंनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. त्यामुळे नट म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकीचे भान सुटू दिले नाही. पाच दशके मराठी चित्रपट व नाट्य जगतावर राज्य केले. बॉलीवूडनेही त्यांच्या अभिनयाची  दखल घेतली.  निळू फुले एक सच्चे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यापेक्षाही ते एक सच्चे माणूस होते असे म्हणणे जास्त योग्य होईल.

हे पुस्तक निळू फुलेंच्या प्रत्येक पैलूवर (माणूस, कार्यकर्ता, नट, वडील वगैरे) प्रकाश  टाकते. त्यांनी समाजासाठी घेतलेले कष्ट बघून आपण अवाक होतो.  आपण समाजाचे देणे लागतो हि जाणीव आणि टोचणी  हे पुस्तक नक्की करून देते. नट म्हणून काम करताना काय दृष्टीकोन असणे आवश्यक आहे ह्या साठी हे पुस्तक प्रत्येक नटाने  वाचणे गरजेचे आहे. पुस्तकात निळू फुलेंच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल हि माहिती आहे. संसारात नवरा – बायकोनी कसे वागले पाहिजे ह्याचीही शिकवण आपल्याला नकळत मिळते.

निळू फुलेना राजकारणाची चांगली जाण होती. डॉक्टर राम मनोहर लोहिया हे निळू फुलेंचे दैवत. निळू फुलेंनी प्रत्येक नवीन विचारधारा अभ्यास पूर्वक स्वीकारली. त्यांच्या प्रत्येक कृतीत दुसऱ्याचा विचार प्रथम असे. त्यामुळे स्वतःच्या कष्ठाची पर्वा त्यांनी केली नाही.

पुस्तकाचा font मोठा आहे त्यामुळे पुस्तक एका बैठकीत वाचून होते. पुस्तकातील फोटोमुळे त्यांचे व्यक्तिमत्व आपल्याला  भारून टाकते.
अश्या उत्तुंग माणसाची ओळख करून दिल्याबद्दल  लेखकाचे अभिनंदन. निळू फुलेंच्या मुलीला ‘गार्गी’ ला best  wishes .

मित्रानो, वेळ काढून हे पुस्तक नक्की वाचा हि विनंती.

CA . सुधीर वैद्य
http://www.spandane.com
१४-०३-२०१२ 

Advertisements

2 Responses to “१४) जनामनातला माणूस निळू फुले / लेखक रजनीश जोशी”


  1. 1 akshay watve August 9, 2014 at 3:31 pm

    मला हे पुस्तक विकत हवे आहे. कुठे मिळेल मी पुण्यात राहायला आलोय.. प्लीज मदत करा.


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

April 2012
M T W T F S S
    May »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: