१२२) ” सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची ” / लेखक महेश यशराज

122) Photo3654

१२२) ” सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची ” / लेखक महेश यशराज /
रुपये १५०/- पृष्ठे ८० / सहावी आवृत्ती – २३-०५-२०१३

पुनर्विकासाचा भूलभुलैया आणि सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची अश्या दोन पुस्तकांचा संच विकला जातो. त्यामुळे आणखी एका विषयाची ओळख करून घेण्याचा योग आला.

आजकाल प्रत्येक शास्त्राचे documentation होते. त्यामुळे बांधकामशास्त्राचे पुस्तक प्रसिद्ध झाले तर नवल नाही. विनोदाने असे म्हणावे लागेल कि बांधकाम site वरील असंख्य मजूर आणि site निरीक्षक ह्यांनी हे पुस्तक वाचले नसण्याचीच शक्यता जास्त. असो.

आज अनेक व्यवसाय करण्यासाठी Professional qualification आणि training ची आवश्यकता असते. परंतु कदाचित बांधकाम व्यवसाय हा असा एकच व्यवसाय आहे कि जो कोणत्याही Professional qualification आणि training शिवाय केवळ इतर व्यावसाईक मंडळीना हाताशी धरून (Architect, Structural Engineer, Advocate वगैरे ) व मदत घेऊन सुरु करता येतो.

अन्न , वस्त्र आणि निवारा ह्या मनुष्याच्या प्राथमिक गरजा असल्यामुळे बांधकाम व्यावसाईक मंडळीना चांगले दिवस आहेत.

माणसे इतर बारीक सारीक गोष्ट खरेदी करताना किमतीच्या मानाने नको इतकी घासाघीस करतात. पण घर घेण्याची मात्र नको इतकी घाई केली जाते. इमारतीच्या बांधकामाबद्दल फारशी माहिती विचारली जात नाही. Ready Possession मुळे बांधकाम कसे असेल हे हि कळत नाही.

परंतु पुनर्विकासप्रक्रियेत सभासद बांधकामाच्या दर्जावर नियंत्रण ठेऊ शकतात. त्यामुळे ह्या पुस्तकातून जुजबी माहिती मिळत असली तरी त्या माहितीचा उपयोग आपण नक्की करू शकतो. हि माहिती जरी आपण developer आणि PMC बरोबर बांधकामाबद्दल चर्चा करताना खुबीदारपणे वापरली किंवा त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले तरी हि मंडळी सतर्क राहतील व बरे काम करण्याचा प्रयत्न करतील. ह्या माहितीचा वापर करून ह्या संबंधी अधिक माहिती मिळवता सुद्धा येईल.

कशी वाटली idea ची कल्पना.

पुनर्विकास हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. जुन्या इमारतीत राहणारा प्रत्येक जण Tower मध्ये राहण्याचे स्वप्न बघू लागला आहे. पुनर्विकासासाठी सरकारने बंधनकारक मार्गदर्शक प्रणाली तयार केली आहे. सहनिवासानी ह्या Circular नुसार पुनर्विकास करणे अपेक्षित आहेत. परंतु अनेक वेळा ह्या circular चे letter आणि spirit प्रमाणे पालन होत नाही व त्यामुळे पुनर्विकास वेळेत होत नाही व अनेक सभासदांना बेघर व्हावे लागते. नवीन बांधकामाच्या तक्रारी २-३ वर्षात सुरु होतात आणि मग लक्षात येते कि आपली जुनी इमारत ह्यापेक्षा बरी होती. पण हि पश्चात बुद्धी असते. पुनर्विकास म्हणजे केवळ जास्त जागा. मुबलक corpus fund नव्हे, तर वेळेत – नियमानुसार आणि परत दुरुस्तीचा त्रास नसावा असे झाले पाहिजे.

पुस्तक अतिशय सोप्या भाषेत लिहिले आहे. ज्या माणसाला कोणत्याही कामाचे निरीक्षण करण्याची सवय आहे त्याच्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक पर्वणीच आहे. (मला असे निरीक्षण करण्याचा छंद आहे आणि त्यातील skill ची तुलना मी नेहमी व्यावसाईक मंडळींबरोबर करतो. माझ्या संकेत स्थळावर मी काही लेख लिहिले आहेत. असो. )

पुस्तकात सिमेंट, रसायने, लोखंडी सळ्या, पाणी , RCC कसे तयार करायचे, बांधकाम करताना काय आणि कशी काळजी घ्यायची वगैरे माहिती सोप्या भाषेत दिली आहे. ह्या माहितीचा उपयोग घरातील दुरुस्ती कामात सुद्धा होऊ शकेल.

लेखक पुनर्विकास योग्य रीतीने होण्यासाठी मोफत परिसंवादाचे आयोजन करतो. ह्या आगळ्या वेगळ्या समाजसेवेला माझा प्रणाम.

दोन शब्द लेखकाबद्दल :

१) PMC म्हणून पुनर्विकासासाठी महत्वपूर्ण सेवा.
२) ३२ वर्षांचा बांधकाम व अंतर्गत सजावट कामांचा सर्वांगीण अनुभव .
३) लेखकाकडे स्वत:ची बांधकाम संदर्भातील ५ patents .
४) समाज प्रबोधन करणाऱ्या अनेक पुस्तिकांचे लेखन .
५) मोफत परिसंवादाद्वारे लोकांना पुनर्विकासाबद्दल जागृत करणे .
६) बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे मुख्य संचालक
७) बांधकाम कंपन्यांचे प्रकल्प कार्यान्वित करणे
८) अमेरिकन concrete institute चे आजीवन सभासद

संपर्क :

ypmc.in@gmail.com
Mobile: 9223419450
SMS: 7303055782

अश्या लोकापयोगी विषयावर पुस्तक लिहिल्याबद्दल सर्व वाचकांच्या तर्फे मी लेखकाचे आभार मानतो व तो करत असलेल्या कार्याला अनेक शुभेच्छा देतो.

लेखकाने पुनर्विकास भूलभुलैया असे पुस्तक (सहावी आवृत्ती -२३-०५-२०१३) लिहिले आहे. त्या पुस्तकाची किंमत रुपये १३० आहे. दोन्ही पुस्तकांची एकत्रित किंमत जरी [१५० +१३० = २८०/- रु.] असली तरी एका ट्रस्टला मदत करण्यासाठी ती दोन्ही पुस्तके ना नफा ना तोटा तत्वावर फक्त १२०/- रुपयांना [दोन्ही] विकली जातात.

सुधीर वैद्य
२०-१२-२०१४

0 Responses to “१२२) ” सोप्पी ओळख बांधकाम शास्त्राची ” / लेखक महेश यशराज”



  1. Leave a Comment

Leave a comment




Archives

January 2015
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.